महेंद्र सिंग धोनी याच्या आयपीएल निवृत्तीबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असले तरी, त्याने स्वतः दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. च्या पहिल्या हंगामापासून खेळत असलेला धोनी आता 19व्या हंगामासाठी सज्ज झाला आहे, पण तो हा शेवटचा हंगाम ठरणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

चेन्नई सुपर किंग्स च्या 22 मार्च 2026 रोजी झालेल्या कार्यक्रमात धोनीला निवृत्तीबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. (IPL) त्यावर त्याने नेहमीप्रमाणेच हसत उत्तर दिलं आणि स्पष्ट भूमिका घेणं टाळलं. मात्र त्याच्या बोलण्यातून फिटनेस हा निर्णायक घटक ठरणार असल्याचे संकेत मिळाले. सध्या 44 वर्षांचा असलेला धोनी म्हणाला की, त्याचा फिटनेस कधी चांगला तर कधी खालावलेला असतो, त्यामुळे पुढील निर्णय घेणं सोपं नाही. तरीही तो शक्य तितकं सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं.
गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही “धोनीचा शेवटचा आयपीएल” ही चर्चा रंगली असली तरी, त्याने पुन्हा एकदा निश्चित उत्तर देणं टाळलं आहे. (IPL) त्यामुळे त्याचा निरोप कधी होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. मात्र वय आणि फिटनेसचा विचार करता, त्याच्या कारकिर्दीचा शेवट जवळ येत असल्याची जाणीव त्याच्या वक्तव्यातून दिसून आली.
दरम्यान, आगामी हंगामात धोनी इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मैदानावर कमी वेळ घालवत असला तरी, विकेटमागून संघाला दिशा देण्याची जबाबदारी तो निभावू शकतो. मागील हंगामात कर्णधार Ruturaj Gaikwad दुखापतग्रस्त झाल्यानंतर धोनीने संघाची सूत्रं हाती घेतली होती, मात्र संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती.2025 च्या हंगामात चेन्नईचा संघ 14 पैकी केवळ 4 सामने जिंकू शकला आणि गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिला. या पार्श्वभूमीवर आगामी हंगामात संघाकडून पुनरागमनाची अपेक्षा आहे, आणि (IPL) त्यात धोनीची भूमिका किती महत्त्वाची ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?