उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेसोबतच लहान मुलांमध्ये वारंवार ताप येण्याच्या तक्रारीत वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे. तज्ञांच्या मते, ही समस्या सामान्य समजून दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते, कारण त्यामागे शरीरातील बदल किंवा संसर्गाची सुरुवात दडलेली असू शकते.

प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एल.एच. घोटकर यांच्या माहितीनुसार, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने पसरतात. यामुळे मुलांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः शाळेत जाणारी किंवा बाहेर खेळणारी मुले धूळ, घाण आणि दूषित पाण्याच्या संपर्कात येतात, ज्यामुळे ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, भूक न लागणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात .या हंगामात शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम निघत असल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. पुरेसे पाणी न पिणे, असंतुलित आहार आणि जंक फूडचे वाढते सेवन यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. (summer) त्यामुळे त्यांना वारंवार ताप येण्याची शक्यता अधिक वाढते. काही प्रकरणांमध्ये उलट्या, जुलाब किंवा चिडचिडेपणाही दिसून येतो.

डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होतात. अशा दूषित अन्न किंवा पाण्यामुळे संसर्ग होऊन ताप येऊ शकतो. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित नसल्यामुळे ते लवकर आजारी पडतात, त्यामुळे पालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.तज्ञ सुचवतात की मुलांना दिवसभर पुरेसे पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा इतर द्रव पदार्थ देणे आवश्यक आहे. कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि सकाळी किंवा संध्याकाळीच खेळण्याची वेळ ठेवावी. हलका, ताजा आणि पौष्टिक आहार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (summer) यासोबतच स्वच्छतेची सवय लावणे, घाम आल्यावर लगेच कपडे बदलणे आणि घरातील वातावरण स्वच्छ व थंड ठेवणे आवश्यक आहे.

जर मुलाला ताप वारंवार येत असेल, जास्त दिवस टिकत असेल किंवा त्यासोबत उलट्या, जुलाब, तीव्र अशक्तपणा किंवा अंगदुखी दिसत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. (summer) योग्य वेळी घेतलेली काळजी आणि उपचार यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या तापाच्या समस्येपासून मोठ्या प्रमाणात बचाव करता येऊ शकतो.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *