महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत (financial assistance) मिळणाऱ्या अनेक महिलांसाठी सध्या अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचे पैसे अचानक बंद झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, अनेक महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सरकारकडून करण्यात (financial assistance) आलेल्या पडताळणीत काही महिलांना योजनेच्या निकषात न बसल्यामुळे वगळण्यात आले आहे. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये तांत्रिक किंवा कागदपत्रांशी संबंधित त्रुटी आढळून आल्या आहेत. बँक खात्याची चुकीची माहिती, आधार क्रमांक आणि बँक खात्याचे लिंकिंग न झालेले असणे, अर्ज करताना भरलेली चुकीची माहिती किंवा विविध कागदपत्रांमधील विसंगती यामुळेही लाभ थांबवण्यात आला आहे. काही महिलांच्या कागदपत्रांमध्ये नाव, पत्ता किंवा इतर तपशील वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न आढळल्याने त्यांची नोंदणी अपूर्ण ठरली आहे.
केवायसी करताना देखील अनेकांकडून चुका झाल्याचे समोर आले आहे. काही महिलांनी प्रश्न व्यवस्थित न समजल्यामुळे चुकीची उत्तरे दिली, तर काहींची माहिती अपूर्ण राहिली. परिणामी, त्यांचे अर्ज अपात्र ठरले आणि लाभ बंद करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर सरकारने अशा महिलांना दिलासा देत पुन्हा एक संधी देण्याचा (financial assistance) निर्णय घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांचे पैसे थांबले आहेत, त्यांना ३१ मार्चपर्यंत केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे. महिलांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली माहिती काळजीपूर्वक भरून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.सरकारच्या या निर्णयामुळे अनेक महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, यासाठी केवायसी करताना अचूक आणि सुसंगत माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?