अध्यात्म आणि भक्तीच्या आड लपून महिलांचे लैंगिक शोषण (sexually exploiting) आणि भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेल्या या प्रकरणाने दिवसेंदिवस अधिक गंभीर वळण घेतले असून तपासात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुरुवातीला केवळ एका (sexually exploiting) गुन्ह्यापुरते मर्यादित असलेले हे प्रकरण आता मोठ्या रॅकेटचे रूप घेत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत खरातविरोधात एकूण सहा गुन्हे दाखल झाले होते, मात्र तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे आणखी पीडित पुढे येत आहेत. अलीकडेच तीन नवीन तक्रारी दाखल झाल्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व तक्रारींमध्ये लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि विनयभंग यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, खरातने दैवी शक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेक महिलांचे शारीरिक शोषण केले.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी विशेष तपास (sexually exploiting) पथकाची स्थापना केली आहे. हे पथक खरातच्या आर्थिक व्यवहारांची, मालमत्तेची तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची सखोल चौकशी करत आहे. तपासादरम्यान असेही उघड झाले आहे की, खरातने काही लोकांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून आर्थिक गुन्ह्यांचाही मोठा भाग यात समाविष्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, अनेक पीडित महिला सामाजिक दबाव आणि भीतीमुळे तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू केले असून तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अधिकाधिक पीडितांनी पुढे येऊन न्याय मिळवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज होणारी (sexually exploiting) न्यायालयीन सुनावणी या प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गुन्ह्यांची वाढती संख्या आणि तपास अद्याप अपूर्ण असल्यामुळे पोलिसांकडून अशोक खरातच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणात खरातला आणखी कोणाची मदत होती का, याचाही तपास सुरू असून येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?