पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात(digestive) अनेक अडथळे निर्माण होतात. पचनक्रिया बिघडल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अ‍ॅसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय शरीरामध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोटात दुखणे किंवा आतड्यांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादीमुळे शरीराला हानी पोहचते. दैनंदिन आहारात खाल्ले जाणारे तिखट तेलकट पदार्थ, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर अननपदार्थ पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो. पोट बिघडल्यानंतर शारीरिक तणावासोबतच मानसिक तणाव सुद्धा निर्माण होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोट आणि आतड्यांचे आरोग्य कायम निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या आयुर्वेदिक आंबवलेल्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात चांगल्या जिवाणूंची वाढ होते आणि आरोग्य सुधारते.

ताक:
शरीराची पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित (digestive)दुपारच्या जेवणात ताकाचे सेवन करावे. नियमित एक ग्लास ताक पय्यल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक किंवा दही खाण्याचा सल्ला दिला जातो. आंबट चवीचे पदार्थ खाल्यामुळे लाळग्रंथी उत्तेजित होतात. यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात. याशिवाय ताक प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटी कमी होण्यासोबतच अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

घरगुती आंबट लोणचं:
जेवणाच्या ताटात लोणचं असेल तर चार घास जेवण जास्त जाते. आंबट गोड चवीचे लोणचं आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितके वाईट सुद्धा आहे. मोहरीचे तेल, मीठ आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेले घरगुती लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. सूर्याच्या प्रकाशात तयार केलेल्या लोणच्यांमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक आढळून येतात. पण बाजारात विकत मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये रासायनिक प्रिझर्वेटिव्हयुक्त घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते.

आवळ्याचा मुरंबा:
विटामिन सी युक्त आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीरासह आरोग्याला अनेक फायदे होतात. गूळ आणि मधामध्ये भिजवलेला आवळा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केस आणि त्वचा कायमच निरोगी राहते. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.

कांजी:
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तयार केलेले जाणारे आंबट गोड कांजी पेय चवीला अतिशय सुंदर लागते. काळे गाजर, बीट आणि चाट मसाल्याचा वापर करून बनवलेले कांजी पेय शरीरात वाढलेली उष्णता कमी करते. यामध्ये प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स प्रमाण भरपूर असते. या पेयाचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

हेही वाचा :

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *