बांग्लादेशमध्ये ईद सणाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी (sad day) बुधवारची संध्याकाळ अत्यंत दुःखद ठरली. राजबारी जिल्हा येथील दौलतडिया टर्मिनल येथे प्रवाशांनी भरलेली बस फेरीवर चढत असताना अचानक नियंत्रण सुटून थेट पद्मा नदीच्या खोल पाण्यात कोसळली. या भीषण अपघातात लहान मुलांसह किमान २३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे (sad day) पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बस प्रवाशांना घेऊन फेरीवर चढत होती, मात्र अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीत कोसळली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बस फेरीकडे जात असताना एका छोट्या बोटीला धडकली आणि त्यानंतर हा अपघात घडला. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते, जे ईदच्या सुट्ट्या संपवून ढाकाकडे परतत होते.
अपघातानंतर काही प्रवाशांनी पोहून आपले प्राण वाचवले, मात्र अनेकांना (sad day) बाहेर पडता आले नाही. या घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला. माहिती मिळताच लष्कर, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत होते, तरीही सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर विशेष जहाज आणि क्रेनच्या मदतीने बस नदीबाहेर काढण्यात आली. सुरुवातीला काही मृतदेह सापडले आणि बस बाहेर काढल्यानंतर मृतांची संख्या वाढली.
या दुर्घटनेत ११ जणांनी कसाबसा जीव वाचवला असून काही प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, बांग्लादेश सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, घाईगडबड आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार