आंध्र प्रदेशातील रायवरम येथे एक भीषण अपघात घडला असून या (terrible accident) दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका भरधाव ट्रकने खासगी बसला जोरदार धडक दिल्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला आणि काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या आगीत किमान 10 प्रवासी जिवंत जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही खासगी बस (terrible accident) हैदराबाद येथून पामुरकडे जात होती. दरम्यान, चिमाकुर्थी परिसरातून बाजरी घेऊन जाणाऱ्या टिपर ट्रकशी बसची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बस डिव्हायडरला जाऊन आदळली आणि लगेचच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीमुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. (terrible accident) त्यांनी तत्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत बस आणि ट्रक दोन्हीही आगीत पूर्णपणे जळून खाक झाले होते. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यांत सहभाग घेत जखमींना रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात हलवले. या अपघातामागे वेग हे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये बहुसंख्य नागरिक हे कनिगिरी आणि पामुर परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार

निवृत्तीनंतर सुरक्षित भविष्यासाठी ‘या’ 5 आर्थिक गोष्टी जाणून घ्या
शहरातील दोन गॅस वितरकांवर कारवाई; जिल्हा पुरवठा कार्यालयाला अहवाल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *