पोस्ट ऑफिसच्या (investment schemes) सुरक्षित गुंतवणूक योजनांमध्ये मुदत ठेव (टाइम डिपॉझिट – TD) योजना नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. हमीदार परतावा आणि सरकारी संरक्षणामुळे ही योजना गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह पर्याय मानली जाते. बँकेतील एफडीप्रमाणेच या योजनेत ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवले जातात आणि त्या कालावधीनंतर व्याजासह रक्कम परत मिळते.पोस्ट ऑफिस विविध कालावधीसाठी TD योजना उपलब्ध करून देते. गुंतवणूकदारांना १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षे अशा पर्यायांमधून निवड करता येते. सध्या १ वर्षांच्या TD योजनेवर ६.९ टक्के व्याजदर लागू आहे. त्यामुळे अल्प कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी ही योजना आकर्षक ठरते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने १ वर्षासाठी २ लाख रुपये गुंतवले, तर ६.९ टक्के व्याजदरानुसार (investment schemes) वर्षाअखेर त्याला सुमारे १४,१६१ रुपये व्याज मिळते. परिणामी, मुदत पूर्ण झाल्यावर एकूण रक्कम अंदाजे २,१४,१६१ रुपये होते. या योजनेत मिळणारा परतावा निश्चित असल्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा त्यावर परिणाम होत नाही.विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या TD योजनेत सर्व वयोगटांसाठी समान व्याजदर लागू असतो. बँकांच्या तुलनेत जेष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ येथे दिला जात नाही. तरीही, सुरक्षितता आणि स्थिर परतावा यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या या योजनेकडे वळताना दिसत आहेत.

हेही वाचा :

खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार

दिनेश कार्तिक होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? या खेळाडूने सांगितलं कसं ते
तर त्या शेतकर्‍यांचे फार्मर आयडी बंद , शासकीय योजनांपासून होणार वंचित, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *