सध्या राज्यातच नाही देशभरात इंधन टंचाईची अफवा उडाली आहे. त्यातच अनेक पेट्रोल पंपासमोर नो स्टॉकचे बोर्ड झळकल्याने नागरिक सैरभैर झाले आहेत. पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. त्यातूनच वादाचे रुपांतर हाणामारीत होताना दिसत आहे.

इंधन तुटवड्याची झळ सर्वांनाच जाणवत आहे. केंद्रासह राज्य सरकारने इंधन तुटवडा नसल्याचे आवाहन केले असले तरी राज्यातील अनेक शहरातील पेट्रोल पंपासमोर नो स्टॉकचे बोर्ड लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहेत, त्या पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (entire) त्यातूनच वाद वाढल्याचे समोर येत आहे. तर काही ठिकाणी वादाचे रुपांतर थेट हाणामारीत होत आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका पेट्रोल पंपावर असाच राडा दिसून आला.
लातूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल टंचाईची अफवा पसरली आहे. ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपावर लागल्या आहेत. त्यातच काही ग्राहक धाकटशाहीचा वापर करत आहेत. काही जण एकदा पेट्रोल भरल्यावर पुन्हा त्याच रांगेत घुसखोरी करत आहेत. तर काही जण कॅन, प्लास्टिक बॉटल यामध्ये पेट्रोल देण्याचा आग्रह धरत आहेत. त्यातून पंपावरील कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात वाद वाढले आहेत. असाच एक वाद अहमदपूरमध्ये विकोपाला गेला. दोन गटात तुफान हाणामारी झाली. ग्राहक आणि पंप कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली.
बॉटलमध्ये पेट्रोल देण्याच्या मागणी नंतर वादाला सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांनी बॉटलमध्ये पेट्रोल देता येत नसल्याचे सांगितले. तर ग्राहक दुचाकीसह मोठ्या बॉटलमध्ये पेट्रोल देण्याचा आग्रह धरत होता. त्यातून कर्मचारी आणि ग्राहकात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. कर्मचारी आणि ग्राहक आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांमध्ये तुफान मारामारी झाली. काठीचा प्रसादही ग्राहकाला बसला. तर या वादात एकाचे डोके फुटले तर इतर तीन जणांनाही चोप बसला. (entire) यावेळी एकाने लोखंडी बाकडा मारण्यासाठी उचलला होता. पण इतर ग्राहकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. ग्राहक पेट्रोल टंचाईच्या अफवेने पॅनिक झाल्याचे, चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. तर ग्राहक अधिक पेट्रोल भरण्याचा आग्रह धरत असल्याने कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद होत असल्याचे दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील हसनाबाद येथील पेट्रोल पंपावर दुचाकी आणि चार चाकी वाहनधारकांची तुफान गर्दी दिसली. पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक कॅन घेऊन सकाळपासूनच पेट्रोल पंपावर दाखल झाले आहेत. इंधन मिळणार नाही ही अफवा उडाल्यानंतर अनेक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनधारकांच्या जवळपास एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. (entire) तर ग्रामीण भागातील नागरिक देखील छोट्या मोठ्या कॅन घेऊन पंपावर, अचानक वाढलेली गर्दी पाहून कर्मचार्यांची तारांबळ उडाली आहे.
हेही वाचा :
रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून
सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर