राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस (temperature) वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. परभणी, ब्रह्यपुरी, वर्धा, अमरावती आणि अकोला या भागांमध्ये उष्णतेचा कडाका स्पष्टपणे जाणवत आहे, तर सोलापूर आणि वाशिममध्येही तापमान ३९ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवरही तुलनेने कमी वर्दळ दिसत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी (temperature) उष्णतेच्या लाटेसोबतच पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलांमुळे तापमानात चढउतार होण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आज काहीसा विराम मिळाला असला तरी पुढील दोन ते तीन दिवसांत पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
अकोल्यात गेल्या काही दिवसांत तापमान स्थिर राहिल्यानंतर अचानक वाढ होऊन पारा ४१ अंशांच्या पुढे गेला. त्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळण्यास सुरुवात केली असून उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काळजी घेतली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात (temperature) मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. कांदा आणि गहू काढणीच्या हंगामात आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामानातील या अनिश्चित बदलांमुळे राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार