मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असताना अमेरिका, इस्त्रायल (stopping the conflict) आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही. उलट इराणने पाकिस्तानवर अविश्वास व्यक्त करत त्याला चर्चेपासून दूर ठेवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (stopping the conflict) अमेरिकेकडून पाकिस्तानच्या माध्यमातून इराणकडे १५ सूत्रांचा युद्धविराम प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र इराणने हा प्रस्ताव ठामपणे फेटाळून लावला. इराणने स्पष्ट केलं की, पाकिस्तानकडून चाललेले प्रयत्न विश्वासार्ह वाटत नाहीत आणि या प्रक्रियेत पाकिस्तान केवळ राजकीय श्रेय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मध्यस्थीला ते गांभीर्याने घेत नाहीत.
याचदरम्यान इराणकडून भारताबाबत सकारात्मक भूमिका समोर आली आहे. (stopping the conflict) भारत हा आपला विश्वासार्ह मित्रदेश असल्याचं इराणने म्हटलं असून, आवश्यक असल्यास युद्धविरामाच्या चर्चेत भारताचा सहभाग मान्य असल्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानपेक्षा भारतावर अधिक विश्वास असल्याचं अप्रत्यक्षपणे इराणने स्पष्ट केल्याने दक्षिण आशियाई राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धविरामासाठी उत्सुक असल्याचा दावा केला होता. मात्र इराणने हा दावा फेटाळून लावत आपण अशा कोणत्याही प्रस्तावावर अधिकृत भूमिका घेतलेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पाकिस्तानने मात्र (stopping the conflict) आपले प्रयत्न थांबवलेले नाहीत. त्यांनी सौदी अरेबिया, तुर्कस्थान आणि मिस्त्र यांसारख्या मुस्लिम देशांना एकत्र करून इस्लामाबादमध्ये युद्धविराम चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र इराणच्या नकारात्मक भूमिकेमुळे या उपक्रमालाही मोठा धक्का बसला आहे. एकूणच, या संघर्षात केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर कूटनीतीच्या स्तरावरही मोठी चढाओढ सुरू आहे. विविध देश आपापल्या पद्धतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असले, तरी प्रत्यक्षात कोणाला मध्यस्थीची भूमिका मिळते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून