साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने (shocking incident) संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मृत्यूनंतरही माणसाच्या देहाचा सन्मान राखला जावा, ही अपेक्षा असताना येथे झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे दोन कुटुंबांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना चेहरा न दाखवता देण्याची घाई केली आणि इथेच मोठी चूक घडली. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही मृतदेहांची अदलाबदल झाली.

या गंभीर चुकीची कुणालाही कल्पना नव्हती. (shocking incident) एका कुटुंबाने आपल्या नातेवाईकाचा समजून दुसऱ्याच व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू केले. चिता पेटल्यानंतर काही वेळातच हा प्रकार उघडकीस आला आणि नातेवाईकांवर पेटती चिता विझवण्याची वेळ आली. या घटनेने उपस्थित सर्वजण हादरले, तर संबंधित कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्या. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांना देखील नातेवाईकांनी जाब विचारला. प्रकरणाची गंभीर दखल घेत शवविच्छेदन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
या घटनेमुळे सरकारी रुग्णालयांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (shocking incident) सरकारकडून आरोग्य व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मृत्यूनंतरही माणसाच्या सन्मानाची जपणूक व्हावी, हीच किमान अपेक्षा असताना साताऱ्यात घडलेला हा प्रकार अत्यंत संतापजनक मानला जात आहे.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक