राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले (dangerous)असून अनेक भागात वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून काही भागात आधीच गारपिटीमुळे नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत.या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात एक नवीन हवामान (dangerous)प्रणाली सक्रिय झाली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस हवामानात मोठा बदल दिसून येणार आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील काही भागात अचानक हवामान बदलल्याने (dangerous) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विशेषतः जुन्नर परिसरातील प्रसिद्ध हापूस आंबा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यासोबतच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. a)
याशिवाय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस (dangerous)झाल्यामुळे काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. वडगाव डाळ गावात यात्रेनिमित्त उभारलेला मंडप गारांच्या वजनामुळे कोसळल्याची घटना घडली.या अवकाळी पावसामुळे गावातील सुमारे सात घरांचे नुकसान झाले असून अनेक घरांच्या छतावरील पत्रे व कौल उडाल्याची माहिती समोर आली आहे. काही घरांच्या भिंतीही कोसळल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक