नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यासह देशभरात खळबळ उडवली आहे. (shocking revelations) या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असून, खरातने गेल्या तीन दशकांत शेकडो कोटींची संपत्ती जमवल्याचे उघड होत आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीच्या कारभारात त्याची पत्नी कल्पना खरात हिचाही सहभाग असल्याचा आरोप असून, तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर कल्पना खरात फरार झाली असून, पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे कल्पना खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ती पसार झाल्याची माहिती समोर आली असून, तिला अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथके नाशिक आणि पुण्याकडे रवाना झाली आहेत. कोणत्याही क्षणी तिच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही गंभीर बाबी समोर येत आहेत. एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअरवरही पोलिसांचा संशय असून, येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी होत होती का याची चौकशी सुरू आहे. तसेच एका विशिष्ट मेडिकल स्टोअरमधून गुंगी आणणाऱ्या औषधांची खरेदी केली जात असल्याची माहितीही पुढे आली आहे.
भोंदू अशोक खरातची एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून, तपासात तो (shocking revelations) चार वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये एक नंबर खास व्हीआयपी लोकांसाठी, दुसरा काही निवडक भक्त आणि महिलांसाठी, तिसरा आर्थिक व्यवहारांसाठी तर चौथा सर्वसामान्य लोकांशी संपर्कासाठी वापरला जात होता. सध्या फॉरेन्सिक टीम या सर्व मोबाईल नंबरमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम करत असून, या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक