19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या धुरंधर: द रिवेंज या चित्रपटाने बॉक्स (Dhurandhar) ऑफिसवर जबरदस्त कमाई करत प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले आहे. भारत-पाकिस्तान संघर्ष, हेरगिरी आणि अंडरवर्ल्डचा संगम असलेल्या या कथानकात दिग्दर्शक आदित्य धर यांनी थरारक सीनची प्रभावी मांडणी केली आहे. विशेषतः रणवीर सिंह साकारत असलेला हमजा अली मझारी आणि राकेश बेदी यांचा जमील जमाली हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतात.

चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये हमजा (Dhurandhar) दाऊदसारख्या गँगस्टरला मरक्युरी विष देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्वचेमार्फत पाऱ्याचा एक थेंब शरीरात जाऊन हळूहळू मृत्यू होतो, अशी मांडणी या कथेत दाखवली आहे. क्लायमॅक्समध्ये जमील जमाली आधीच हे मिशन पूर्ण केल्याचं उघड होतं आणि त्यानंतर संबंधित पात्राची प्रकृती अचानक खालावताना दाखवली जाते. या दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात मरक्युरी विष इतकं प्रभावी असतं का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, चित्रपटात दाखवलेली ही मांडणी पूर्णपणे वास्तवाशी जुळणारी नाही. मरक्युरी म्हणजेच पारा हा खरोखरच एक न्यूरोटॉक्सिन आहे आणि तो मेंदू व मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करू शकतो. मात्र, त्वचेमार्फत एका थेंबातून लगेच विषबाधा होणे किंवा पटकन शरीर निकामी होणे हे वास्तवात सहसा घडत नाही. पाऱ्याचा परिणाम बहुधा दीर्घकाळ संपर्कात राहिल्यानंतर दिसून येतो आणि सुरुवातीची लक्षणेही अत्यंत सौम्य असतात.
तज्ज्ञ सांगतात की, मरक्युरीचा सर्वात धोकादायक मार्ग म्हणजे त्याची वाफ (Dhurandhar) श्वासावाटे शरीरात जाणे. अशावेळी ते अधिक वेगाने आणि गंभीर परिणाम घडवू शकते. चिडचिड, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी आणि मज्जासंस्थेचे विकार ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे चित्रपटात दाखवलेली तत्काळ प्रतिक्रिया ही नाट्यमयतेसाठी वाढवून दाखवलेली असल्याचे स्पष्ट होते.
याशिवाय, मरक्युरी शरीरात (Dhurandhar) गेल्यानंतर त्याचे निदान करणेही शक्य असते. रक्त, लघवी किंवा केसांच्या चाचण्यांद्वारे त्याचे प्रमाण ओळखता येते. योग्य वेळी उपचार केल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येते. चिलेशन थेरपीसारख्या उपचारपद्धतींमुळे शरीरातील जड धातू बाहेर काढण्यास मदत होते. मात्र उशीर झाल्यास मज्जासंस्थेवर झालेले नुकसान काही वेळा कायमचे राहू शकते.
एकूणच, ‘धुरंधर: द रिवेंज’मधील मरक्युरी विषाचा सीन प्रेक्षकांसाठी थरारक असला, तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो पूर्णतः अचूक नाही. वास्तविक आयुष्यात पाऱ्याची विषबाधा हळूहळू परिणाम दाखवते आणि ती चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तत्काळ घातक ठरत नाही.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक