नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (case of scam) दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अटकेनंतर सुरू असलेल्या चौकशीत अनेक पीडित पुढे येत असून, तक्रारींचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीने तपास अधिक तीव्र केला असून आता कारवाईचा फास कुटुंबीयांपर्यंतही पोहोचला आहे.

तपासाच्या दरम्यान (case of scam) एसआयटीच्या पथकाने नाशिकमधील गोविंद नगर परिसरातील खरात यांच्या बंगल्यावर धाड टाकली. बंगल्याचे मुख्य गेट बंद असल्याने पथकाने शेजारच्या घरातून प्रवेश करत आत शोधमोहीम राबवली. यावेळी अशोक खरात याचा मुलगा तिथे आढळून आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची व्यक्ती असलेली अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके नाशिक आणि पुणे या दिशांनी रवाना झाली असून संभाव्य ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
तपासाचा व्याप वाढत असताना आता या प्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील (case of scam) काही घटकांचाही समावेश असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही डॉक्टर, सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर्स पोलिसांच्या रडारवर आले आहेत. विशेषतः एका सोनोग्राफी केंद्रात बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत होते का, तसेच मेडिकल स्टोअरमधून गुंगी आणणाऱ्या औषधांची खरेदी होत होती का, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
एकूणच, अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवीन धागेदोरे समोर येत असून या प्रकरणाचे जाळे आणखी मोठे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक