इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे.(attack) हे युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली असतानाच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भीषण हल्ले सुरू आहेत. अशातच आता इराणने बहरीनमधील ॲमेझॉनच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात ॲमेझॉन अंतर्गत येणाऱ्या बटेल्को कंपनीच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही इमारत बहरीनमधील हमाला या भागात आहे. बटेल्को ही बहरीनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून ती ॲमेझॉन वेब सर्विससाठी काम करते. बहरीन सरकारनेही या हल्ल्याची पुष्टी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार कार इराणच्या सैन्याने गुगल, (attack)मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल यांसारख्या अमेरिकेतील 18 प्रमुख कंपन्यांवर 1 एप्रिलपासून हल्ले करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता इराणने हा हल्ला केला आहे. ॲमेझॉनच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला असे दर्शवतो की हे युद्ध आता पारंपरिक आणि लष्करी ठिकाणांपुरते मर्यादित न राहता आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आगामी काळात हे युद्ध आणखी भीषण रूप धारण करण्याची शक्यता आहे.
इराणच्या लष्कराने काल अमेरिकन कंपन्यांबाबत एक निवेदन जारी केले होते. (attack)यात त्यांनी म्हटले होते की, ‘या मोठ्या आयटी आणि एआय कंपन्या इराणविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये अमेरिकेला मदत करत आहेत. या कंपन्या केवळ सॉफ्टवेअर तयार करत नाहीत, तर हल्ल्यांची योजना आखण्यात आणि ते अंमलात आणण्यातही सहभागी आहेत. इराणच्या या निवेदनात गूगल आणि मायक्रोसॉफ्टसोबतच एंथ्रोपिक आणि ओपनएआयसारख्या प्रसिद्ध एआय कंपन्यांचाही उल्लेख करण्यात आला होता.
इराणी लष्कराने पुढे म्हटले होते की, ‘इराणमध्ये होणाऱ्या कोणत्याही (attack)दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आम्ही काही निवडक कंपन्या आणि त्यांच्या युनिट्सना पूर्णपणे नष्ट करू. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले प्राण वाचवण्यासाठी तात्काळ कार्यालय किंवा कार्यस्थळ सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर आता इराणने हा हल्ला केला आहे.
या 18 कंपन्यांना धमकी
डेल
मायक्रोसॉफ्ट
गूगल
अॅपल
इंटेल
IBM
टेस्ला
बोइंग
ह्यूलेट पॅकार्ड
HP
सिस्को
ओरेकल
मेटा
जेपी मॉर्गन
जनरल इलेक्ट्रिक
G42
एनव्हिडिया
प्लॅन्टर
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक