१ एप्रिल म्हणजे आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे.(rules)नवीन आर्थिक वर्षात अनेक नियमात बदल केले गेले आहेत. यामध्ये नवीन कामगार कायदा आणि आयकर कायद्याचा समावेश आहे. यामुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. वाचा एप्रिलपासून नक्की काय काय बदलणार?१ एप्रिलपासून शेअर बायबॅकवर टॅक्स लावण्याची पद्धत बदलणार आहे.

आता बायबॅकपासून होणारी कमाई डिविडेंड इन्कमऐवजी कॅपिटल (rules) गेन्स मानली जाणार आहे. कंपन्यांना २२ टक्के दर टॅक्स द्यावा लागणार आहे. याचसोबत HUF साठी ३० टक्के दर केला आहे.१ एप्रिलपासून F&O ट्रेडिंग महागणार आहे. भविष्यातील कंत्राटवर STT 0.02% टक्क्यांवरुन 0.05% केला आहे. ऑप्शन्ससाठी हा दर ०.१५ टक्के केला आहे. या क्षेत्रात होणारा गैरव्यव्हार कमी व्हावा यासाठी हा टॅक्स वाढवला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक नियमांमध्ये बदल केले आहे. (rules) भारतात आता सर्व डिजिटल पेमेंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन गरजेचे आहे. RuPay Platinum डेबिट कार्ड खरेदी करणाऱ्यांना १वर्षासाठी एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन लाउंजचा वापर मोफत करता येणार आहे. एचडीएफसी आणि पंजाब नॅशनल बँकेने एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमात बदल केले आहेत.आता नॅशनल पेमेंट सिस्टीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PFRDA ने फीमध्ये बदल केला आहे. NAVमध्येही मोठा बदल केला आहे. आता प्रायव्हेट आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NAV वेगवेगळे असते.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक