कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार (injured) पावसाने हजेरी लावली असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत पन्हाळा तालुक्यातील श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर वीज कोसळल्याने पाच भाविक जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असल्याने डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी होती. दिवसभर कडक ऊन अनुभवीत असलेल्या भाविकांना सायंकाळी पावसाने झोडपून काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ (injured) असलेल्या एका झाडावर वीज कोसळली. यावेळी झाडापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या एका गाडीजवळ पाच जण थांबले होते. वीज कोसळल्याने निर्माण झालेल्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्डच्या संपर्कात आल्यामुळे या पाचही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाली करून जखमींना उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, पन्हाळगड परिसरात (injured) अवघ्या एका तासात २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या, ज्यामुळे काही मार्ग बंद झाले होते आणि वीजपुरवठाही खंडित झाला होता. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत केली. चैत्र यात्रेच्या दिवशी पाऊस पडण्याची जुनी आख्यायिका असल्याने भाविकांनी या पावसाला देवाचा आशीर्वाद मानले असले, तरी वीज पडल्याच्या घटनेने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *