कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आणला (Salute)गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या 12 राज्यात आता माओवाद शिल्लक राहिला नसल्याची माहिती सोमवारी एकाच दिवशी सर्वसामान्य जनतेला दिली. बंदुकीच्या नळीतून सुटणाऱ्या गोळीने क्रांती होत नाही, त्याचप्रमाणे परिवर्तनही होत नाही. तर सर्व प्रकारच्या पुनर्वसनाची हमी आणि सर्वांगीण विकासाचा विश्वास निर्माण केला तर कोणतीही गंभीर समस्या सुटू शकते हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. अर्थात त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. दार्जिलिंग परिसरातील नक्षलबाडी या गावातून सुमारे 50 वर्षांपूर्वी नक्षलवाद अर्थात माओवादाची सुरुवात झाली. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे भांडवलशाही प्रवृत्ती कडून आर्थिक शोषण केले जात असल्याचा एकमेव मुद्दा हाती घेऊन सुरू झालेली चळवळ ही नंतर रक्तरंजित होऊ लागली. बंदुकीच्या नळीतून गोळ्या बाहेर पडू लागल्या. भु सुरुंगाचे स्फोट केले जाऊ लागले. दहशत निर्माण करण्यासाठी प्रसंगी निराळ लोकांना क्रूरपणे ठार मारले जाऊ लागले.

एकट्या वीरप्पनने दक्षिणेकडच्या दोन राज्यात दहशत निर्माण केली होती (Salute)अगदी त्याचप्रमाणे माओवाद्यांनी महाराष्ट्रासह तब्बल 12 राज्यांमध्ये आपली दहशत प्रस्थापित केली होती. महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यातमाओवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. आत्तापर्यंत या माओवाद्यांच्याकडून महाराष्ट्रात पोलीस दलातील 244 कर्मचारी व अधिकाऱ्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती.. काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील बस्तर या जिल्ह्यात माओवाद्यांकडून जो दहशतवाद केला जात होता त्यावर एक हिंदी चित्रपट”बस्तर”या नावाने प्रदर्शित झाला होता. माओवाद्यांचे क्रौर्य यासिनेमात दाखवण्यात आले होते. या चित्रपटातील काही प्रसंग अंगावर शहारे आणणारे होते. माओवाद्यांच्या या चळवळीला बळ देण्यासाठी पडद्याआड राहून काही विचारवंतांचे चाललेले प्रयत्न या सिनेमात अतिशय प्रभावीपणे दाखवले होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही नक्षलवाद अर्थात माओवाद संपुष्टात आणण्याची प्रतिज्ञा केली होती.

अर्थातच त्यासाठी बळाचा वापर करायचा (Salute) नाही हे सुद्धा निर्धारपूर्वक ठरवले गेले होते. चर्चेने हा सर्वाधिक गंभीर बनलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा या विचाराने पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते.माओवाद्यांशी संपर्क साधने, त्यांच्यात विश्वास निर्माण करणे, संवादाचे पूल बांधणे, याशिवाय माओवाद सोडून संबंधितांनी शरण यावे यासाठी प्रयत्न करणे, माओवाद्यांवरील गुन्हे मागे घेणे, त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी विविध उपाययोजना करणे, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करणे,सर्वांगीण विकास करत आहोत हा विश्वास प्रस्थापित करणे अशा अनेक पातळीवर माओवाद संपुष्टात आणण्याचे प्रयत्न अगदी पद्धतशीरपणे नियोजनपूर्वक सुरू होते. गडचिरोली या जिल्ह्याला स्टील सिटी बनवणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी केली होती आणि ही घोषणा मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आश्वासक प्रयत्नही सुरू होते.

त्याचवेळी माओवाद चळवळीतील कमांडर, वगैरे पातळीवर काम (Salute)करणाऱ्या माओवाद्यांना बंदुका खाली ठेवून शरण येण्यासाठी केलेल्या आवाहनाला हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आणि एक दिवस असा आला की माओवादी कुणी शिल्लक राहिले नाही.ज्यांच्यावर एक कोटी, पाच कोटी, दहा कोटी अशी रोख बक्षिसे लावलेले खतरनाक माओवादी सरेंडर होऊ लागले. आणि आता कोणीही माओवादी शिल्लक राहिला नाही हे तपासून सिद्ध झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आता माओवाद संपुष्टात आणला गेला आहे अशी घोषणा सोमवारी केली.

या देशातील अनेक राज्यात फोफावलेला माओवाद हा संपुष्टात आणण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. अगदी निरुपाय होईल किंवा पर्यायच राहणार नाही अशाच वेळी माओवाद्यांवर गोळ्यात चालवा अन्यथा त्यांना त्यांच्यात विश्वास निर्माण करून शरणागत होण्यास तयार करा अशा सूचना अमित शहा यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, ओरिसा, केरळ, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातील माओवाद अर्थात नक्षलवाद 2024 पर्यंत संपुष्टात आणला गेला होता आणि छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील माओवाद येथे भाजपचे सरकार आल्यानंतर मोडून काढण्यात आला असा दावा अमित शहा यांनी संसदेत बोलताना केला. एक मात्र खरे की, समस्या कितीही गंभीर असो, त्यावर समाधान काढता येऊ शकते हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. पण त्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यातील पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता ही सर्व राज्ये माओवादापासून मुक्त झालेली असल्यामुळे पोलिसांना आता तेथे निर्भयपणे काम करता येईल.माओग्रस्त परिसराचा विकासही आता झपाट्याने होऊ लागेल यात तीळ मात्र शंका नाही.

हेही वाचा :

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा

या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?

चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *