अभिनेता रितेश देशमुख याने गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित त्याचा भव्य ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

या टीझरमध्ये भव्य सेट्स, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दमदार कलाकारांची झलक पाहायला मिळते. (Raja Shivaji) चित्रपटात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या चित्रपटातील सर्वात मोठी चर्चा म्हणजे अभिनेता सलमान खान याची भूमिका. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान या चित्रपटात मराठा इतिहासातील पराक्रमी योद्धा जिवा महाला यांची भूमिका साकारणार आहे. जीवा महाला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक आणि पराक्रमी योद्धे म्हणून ओळखले जातात.(Raja Shivaji) सलमान खानने या चित्रपटासाठी 2025 मध्येच शूटिंग पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे टीझरमध्ये त्याची झलक अद्याप दाखवण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपटात त्याचा लूक आणि भूमिका कशी असेल याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार एकत्र दिसणार आहेत. यात जेनेलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन इराणी, फर्दिन खान, संजय दत्त, महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. रितेश देशमुखने सोशल मीडियावर टीझर शेअर करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा आवाका खूप मोठा आहे. (Raja Shivaji) गेल्या दहा वर्षांपासून या स्वप्नावर काम सुरू होते आणि आता त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर ठेवताना अभिमान वाटत असल्याचे त्याने नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित हा चित्रपट भव्य स्वरूपात साकारण्यात आला आहे. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकतो, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *