अकोल्यातील पोलीस कोठडीत महिला कैद्याकडून शरीरसुखाची मागणी केल्याच्या (female prisoner) धक्कादायक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी एएसआय राजेश जाधव याला न्यायालयाने तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

अकोला शहरातील सिव्हिल (female prisoner) लाईन पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये अटकेत असलेल्या एका महिलेकडून जाधव याने तिच्या मुलीबाबत अश्लील मागणी केल्याचा आरोप आहे. “तुझ्या मुलीचं वय किती? 10 हजार रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव,” असे वक्तव्य केल्याचे पीडित महिलेने सांगितले. या प्रकारानंतर ती महिला धक्क्यात गेली आणि तिने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
घटनेची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय अनिल जुमळे घटनास्थळी पोहोचले. पीडित महिलेने घडलेला प्रकार सांगताच संतापलेल्या जुमळे यांनी आरोपी अधिकाऱ्याला जाब विचारला. यावेळी संतापाच्या भरात त्यांनी जाधव याच्यावर हात उगारल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
या प्रकरणानंतर जाधव याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला (female prisoner) असून त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले असून, लवकरच तहसीलदारांच्या उपस्थितीत पीडित महिलेपुढे त्याची ओळखपरेड होणार आहे. दरम्यान, या गंभीर घटनेमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी