पुणे शहरात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला (unfortunate incident) असून एका दुर्दैवी घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे सिंहगड रोड परिसरात मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. ही दुर्घटना पु. ल. देशपांडे उद्यान जवळील नवश्या मारुती मंदिर परिसरात घडली.

दुपारच्या सुमारास सुरू (unfortunate incident) असलेल्या पावसात रस्त्यालगतचे झाड उन्मळून पडल्याने त्या ठिकाणी उभे असलेले तिघेजण त्याखाली अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मोठ्या फांद्या हटवत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांत दोन जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले, मात्र रंजना नवनाथ गिरी या महिलेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेदरम्यान पोलिसांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसी (unfortunate incident) बचावकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अचानक कोसळलेल्या झाडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे शहरात अशा घटनांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनीही सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, परिस्थितीची (unfortunate incident) गांभीर्याने दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील धोकादायक झाडांची तपासणी, फांद्या छाटणे तसेच नाले व गटारांची साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित अधिकारी सतर्क झाले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी