कर्नाटकातील होलाळकेरे येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (shocking incident) आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने मित्रमैत्रिणींकडून होणारा सततचा अपमान सहन न झाल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि महाविद्यालयात मोठी खळबळ उडाली आहे.

लिखिता नावाची ही विद्यार्थिनी (shocking incident) मल्लाडीहळ्ळी येथील आयुर्वेद महाविद्यालयात BAMS शिक्षण घेत होती. महाविद्यालयातील काही मित्रमैत्रिणी तिचे नाव एका प्राध्यापकासोबत जोडून वारंवार चिडवत असल्याचा प्रकार घडत होता. या त्रासाबाबत तिने आपल्या आई-वडिलांनाही सांगितले होते. मात्र त्यांनी तिला या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. तथापि, मित्रमैत्रिणींकडून होणारा हा मानसिक छळ सतत वाढतच राहिला. या अपमानाला कंटाळून लिखिताने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिने तिचा छळ करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची नावे नमूद करत, अपमान सहन न झाल्यामुळेच हा निर्णय घेत असल्याचे लिहिले आहे.

मृत विद्यार्थिनीचे आई-वडील दोघेही शिक्षक असून ते होलाळकेरे येथे वास्तव्यास आहेत. (shocking incident) मुलीबाबत असे प्रकार घडत असल्याचे समजताच त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित विद्यार्थ्यांविरोधात चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *