कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अजित दादा पवार यांचा मृत्यू होण्याच्या आधी पंधरा दिवसापासून (Nationalist)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीकरणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेली धूसर आता गंभीर वळणावर पोहोचली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्या दरम्यान आणि काटशहाचे राजकारण विकोपाला गेले आहे. कार्यकारी अध्यक्षाचे अधिकार वाढवून घेण्याच्या महत्त्वकांक्षेतून निवडणूक आयोगाकडे केलेल्या परस्पर पत्र व्यवहारातून या पक्षात सध्या हलकल्लोळ उडालेला आहे.अजित दादा पवार हे जिवंत असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची चर्चा एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली होती. एकत्रीकरणाचा मुहूर्त ठरविण्यात आला होता मात्र अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर एकत्रीकरणाच्या राजकारणाला काहीसा धक्का बसला होता. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा एकत्रितकरणाला विरोध होता. एकत्रीकरण झाले तर शरद पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे जातील अशी भीती वाटत असल्यामुळेच सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायला लावली.सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्या तरी, त्यांच्या अधिकारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पटेल आणि तटकरे यांच्याकडून सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून निवडणूक आयोगाशी परस्पर पत्रव्यवहार केला.

पक्षाच्या संरचनेत बदल करण्याचा किंवा बदल केला गेला असल्याचा,(Nationalist) तसेच कार्यकारी अध्यक्षांचे अधिकार वाढवणारा, राष्ट्रीय अध्यक्षांच्या गैरहजेरीत कार्यकारी अध्यक्षांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेले आहेत असे पत्र त्यांनी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला दिले. अर्थात हे समजल्यानंतर संपत झालेल्या सुनेत्रा पवार यांनी दिनांक 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून यापूर्वीचा पत्रव्यवहार रद्द करण्यात आला असल्याचे कळवले. इतकेच नाही तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन आयोगाशी पत्रव्यवहार करणे हे पटेल आणि तटकरे यांना महागात पडले आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या नव्या कार्यकारणीत या दोघांना कोणतेही पद दिलेले नाही. अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू होण्याच्या आधी दोन महिन्यांपासून ताणतणाव वाढला होता. पक्षातील काही महत्त्वकांक्षी नेते, आपले ऐकत नाहीत. त्यांच्या ओठात एक आणि पोटात दुसरेच काही असल्याचा त्यांना संशय आला होता आणि तो वाढीस गेला होता. आणि म्हणूनच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असे बोलून दाखवायला सुरुवात केली होती.
दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर पक्षातील आपले महत्त्व कमी होईल किंबहुना (Nationalist)आपणाला निर्णय प्रक्रियेत सुद्धा घेतले जाणार नाही अशी भीती पटेल, तटकरे व इतर काही जणांना वाटत होती. अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर या दोघांनीही एकत्रीकरणाविरुद्ध भूमिका घ्यायला सुरुवात केली. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचे आणि कार्यकारी अध्यक्षाचे अधिकार परस्पर वाढवून घ्यायचे अशा हालचालीतून या दोघांनी निवडणूक आयोगाशी परस्पर पत्र व्यवहार केला. याबद्दल त्या काही आपणास बोलणार नाहीत अशी अटकळ त्यांनी बांधली होती. पण सुनेत्रा पवार यांचा त्यांना अंदाज आला नाही. या दोघांनी केलेला पत्रव्यवहार त्यांनी आयोगाला दुसरे पत्र पाठवून रद्द केला. हे या दोघांसाठी अनपेक्षित होते. आता तर त्यांना संघटनेत फारसे स्थान राहिलेले नाही. या दोघांनी आपल्या पतीला म्हणजेच अजितदादा यांना मानसिक त्रास दिला आहे हे पत्नी म्हणून त्यांना नक्कीच माहित असावे आणि म्हणूनच त्यांनी कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केलेली दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण व्हावे ही भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे. कारण तसे घडले तर शरद पवार यांचा गट आपोआपच एनडीए मध्ये विलीन होऊ शकतो.
असे भाजपला वाटते. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही (Nationalist)घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून नवी दिल्लीत सुरू असलेले ऑपरेशन टायगर तसेच डिनर डिप्लोमसी हा सुद्धा भाजपच्या राजकारणाचा एक भाग आहे. एकत्रीकरणाचा निर्णय लवकर घ्या असा एक संदेश भाजपाकडून सुनेत्रा पवार यांना दिला जातो आहे असे म्हणता येईल.
शरद पवार यांनी अतिशय कष्टाने उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेतून फुटला गेला. एक प्रकारे अजितदादा यांनी शरद पवार यांच्याकडून पक्ष हायजॅक केला गेला. तसाच तो आपणही हायजॅक करू असा विचार करून पटेल आणि तटकरे यांनी काही कटकारस्थाने सुरू केली होती आणि त्याला सुनेत्रा पवार यांनी पद्धतशीरपणे निर्धारपूर्वक सुरुंग लावलेला आहे. शह आणि काट शह हा राजकारणाला नवीन नसतो. या डावपेच्यात नक्कीच जिंकले कोण हे मात्र लगेच लक्षात येत नाही. त्याला काही काळ जावा लागतो.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी