पॅन-इंडिया अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा (month) यांच्या लग्नाला नुकताच दीड महिना उलटला असून, आता एका नव्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका सूचक व्हिडिओमुळे ती लवकरच आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.२६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकलेल्या रश्मिकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक लक्षवेधी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विजय आणि रश्मिका यांच्यासारखे दिसणारे ॲनिमेटेड ग्राफिक्स, एक सुंदर पिवळे फूल आणि लाल रंगाचा हार्ट इमोजी दिसत आहे.

या पोस्टला तिने “अब हम तीन हो गये” आता आम्ही तिघे झालो (month) असे कॅप्शन दिले आहे. अलीकडच्या काळात गरोदरपणात लग्न करण्याचा ट्रेंड वाढला असल्यामुळे, रश्मिकाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्समध्ये प्रश्नांचा भडिमार सुरू केला आहे. अनेकांनी ती गरोदर आहे का, असे विचारत तिचे कौटुंबिक जीवनात स्वागत केले आहे.चाहत्यांनी गरोदरपणाचे अंदाज लावले असले तरी, या पोस्टमागील सत्य काहीतरी वेगळेच असण्याची दाट शक्यता आहे.
रश्मिकाने या पोस्टमध्ये एका इन्स्टाग्राम अकाऊंटला आणि ‘रश्मिकारू’ (month) नावाच्या दुसऱ्या एका अकाऊंटला टॅग केले आहे. ‘रश्मिकारू’ हे तिचे स्वतःचे एक वेगळे अकाऊंट असून ती त्याचा वापर एका डायरीसारखा करते, ज्यावर ती छोट्या पण प्रभावी गोष्टी लिहिते. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने, रश्मिका मुलांसाठी एखादा नवीन कार्टून शो किंवा मालिका घेऊन येत आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ‘आम्ही तिघे’ यामधील तिसरा सदस्य नक्की कोण, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी