लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारवर २१३०० कोटींचा आर्थिक भार पडला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास ७२ लाख महिला अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेच्या २.४ कोटी लाभार्थी महिला होत्या. (Ladki Bahin) त्यानंतर आता या महिलांची संख्या १ कोटी ७५ लाख झाली आहे. लाखो महिला अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. दर महिन्याला १५०० रुपये घेतले आहेत. यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.
लाडकी बहीण योजनेतून ७२ लाख महिला अर्ज बाद केले आहेत.या महिलांनी दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. मागच्या २० महिन्यांपासून महिला लाभ घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ पासून अपात्र महिलांना १,०६५ कोटी रुपये दिले आहेत. (Ladki Bahin) यामुळे सरकारवर २१,३०० कोटींचा आर्थिक भार पडला आहे. महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये योजना सुरु केली होती. या योजनेत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहे.
या निकषात पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ सुरु ठेवण्यात आला आहे. पडताळणीमध्ये अपात्र महिलांची माहिती समोर आली. (Ladki Bahin) तेव्हापासून त्यांचा लाभ बंद झाला आहे.लाभार्थी महिला २१ते ६५ वयोगटातील असावी. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला शासकीय कर्मचारी नसाव्यात. महिला किंवा त्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे. याचसोबत महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत नसावेत. जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तरच तुमचा लाभ सुरु राहणार आहे
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी