नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून शहरातील वानाडोंगरी (brutally murdered) परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मातोश्री नगरमध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले पंकज ठाकूर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मेहुणा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज ठाकूर हे आपल्या (brutally murdered) कुटुंबासह मातोश्री नगरमध्ये राहत होते. परिसरातील आकाश मंडल हा तरुण गेल्या काही काळापासून ठाकूर यांच्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. यापूर्वीही ठाकूर यांनी त्याला अनेकदा समज दिली होती. गुरुवारी दुपारी आकाश पुन्हा त्यांच्या घराजवळ फिरताना दिसल्याने ठाकूर यांनी त्याला जाब विचारत फटकारले. याच वादाचा राग मनात ठेवून आकाश मंडलने आपल्या भाऊ हर्षित मंडल आणि आई पुष्पा मंडल यांच्या मदतीने रात्री साडेदहाच्या सुमारास पंकज ठाकूर यांना घराबाहेर बोलावले. त्यानंतर तिघांनी मिळून लोखंडी सळ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या वेळी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या ठाकूर यांच्या मेहुण्यावरही हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात गंभीर (brutally murdered) जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पंकज ठाकूर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, पण पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी पुष्पा मंडल ही स्वतः पोलीस विभागात लिपिक पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *