बंगळुरूमधील चंद्र ले-आऊट परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक (heartbreaking incident) घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर मातेने आपल्या ११ महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने स्वतःचं आयुष्य संपवलं. काही क्षणांच्या दुर्लक्षामुळे आनंदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि एका रात्रीत संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला.

भैरवेश्वर नगरमध्ये राहणारी २९ वर्षीय प्रतिभा ही आयटी क्षेत्रात काम करणारी होती आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करत होती. तिचा पती महांतेश देखील आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. घटनेच्या वेळी तो कामावर गेला होता, तर घरी प्रतिभा आणि त्यांचा ११ महिन्यांचा मुलगा अगस्त्य दोघेच होते. दुपारच्या सुमारास प्रतिभा गच्चीवर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी काही मिनिटांसाठी बाहेर गेली. मात्र, याच काही मिनिटांत दुर्दैवी घटना घडली.
रांगत खेळणारा अगस्त्य बाथरूममध्ये गेला (heartbreaking incident) आणि तिथे पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. काही वेळाने परत आलेल्या प्रतिभाला तो बेशुद्ध अवस्थेत दिसला. तिने त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्या डोळ्यांसमोर पोटचा गोळा निघून गेल्याने ती पूर्णपणे कोसळली. या घटनेनंतर अपराधीपणाच्या भावनेतून प्रतिभाने एक सुसाईड नोट लिहिली. “मी गच्चीवर कपडे आणायला गेले होते, तोपर्यंत माझं बाळ बाथरूममध्ये गेलं. मी त्याला वाचवू शकले नाही, त्याच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे,” असे शब्द तिने लिहिले. त्यानंतर तिने टोकाचा निर्णय घेत स्वतःचं आयुष्य संपवलं.
संध्याकाळी कामावरून घरी परतलेल्या महांतेशने दरवाजा आतून बंद पाहिला. (heartbreaking incident) बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने त्याने स्वतःच दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच त्याला जे दृश्य दिसलं, त्याने त्याच्या आयुष्याचा पाया हलवला. बेडवर मुलाचा निर्जीव देह आणि बाजूला पत्नीने गळफास घेतलेला असल्याचं पाहून तो स्तब्ध झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने आई-मुलाच्या नात्याची वेदनादायक बाजू समोर आली आहे, तर कुटुंबावर आलेल्या या दु:खाने समाजही हळहळ व्यक्त करत आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी