अकोल्यात उघडकीस आलेल्या पोलिस अत्याचाराच्या प्रकरणामुळे राज्यभरात (police atrocities) संतापाची लाट उसळली असून आरोपी पोलिस अधिकारी राजेश जाधव याच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी पोलिस यंत्रणा वेगाने तपास करत असल्याचा दावा केला जात असतानाच, अकोल्यातील या घटनेने पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात (police atrocities) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश जाधव याच्यावर पोलिस कोठडीत असलेल्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. ३१ मार्च रोजी सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर प्रकरणाने तात्काळ वेग घेतला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर जाधवविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर जठारपेठ परिसरातून त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणात न्यायालयाने जाधवला न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी त्याच्या (police atrocities) वागणुकीने आणि पोलिसांच्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अकोला जिल्हा कारागृहाबाहेरचे काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये जाधवला पोलिसांकडून विशेष वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे. गाडीतून उतरतानाच त्याच्या हातात पाण्याची बाटली दिसते, तसेच तो परिसरात बिनधास्त फिरताना आणि पोलिसांशी सहज गप्पा मारताना दिसतो. एवढेच नव्हे तर एका पोलिसाचा मोबाईल घेऊन तो बोलताना देखील दिसून आला आहे.
या सर्व प्रकारामुळे आरोपी हा स्वतः पोलिस दलातील असल्यामुळेच त्याला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कारागृहासमोर अनेक लोक त्याला भेटताना दिसत असतानाही तेथील पोलिसांनी कोणतीही कारवाई किंवा हस्तक्षेप केल्याचे दिसत नाही. त्यामुळे कायद्यापुढे सर्व समान आहेत का, की काहींना वेगळे निकष लागू होतात, यावर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा (police atrocities) एक व्हिडिओ आधीच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाधवला सुनावताना आणि त्याच्यावर संताप व्यक्त करताना पाहायला मिळाले होते. “वर्दी घातलीस ना तू, लाज कशी वाटली नाही?” अशा कठोर शब्दांत त्याला फटकारण्यात आले होते. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून पीडित महिलेसमोर आरोपीची ओळखपरेडही पार पडली आहे. तहसीलदारांच्या उपस्थितीत कारागृहातच ही प्रक्रिया पार पडल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणात सत्य बाहेर येऊन पीडितेला न्याय मिळेल का, आणि पोलिस दलातील अशा प्रकारांवर कठोर लगाम लागेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी