कोल्हापूरमध्ये प्रशासनात मोठी उलथापालथ झाली असून जिल्ह्यातील (posts)प्रमुख पदांवर एकाच दिवशी बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली आहे.महापालिकेच्या आयुक्तपदी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्ती झाली असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजापूर येथील उपविभागीय अधिकारी डॉ. हसरत जास्मिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची सोलापूर जिल्हाधिकाऱ्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बदल्यांचे आदेश सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी जारी केले आहेत.

डॉ. विजय राठोड हे २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी असून (posts) त्यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्हा परिषद, मिरा-भाईंदर महापालिका तसेच मेळघाट येथे विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते एमआयडीसीमध्ये कार्यरत होते. पश्चिम बंगालमधील निवडणूक कामकाजामुळे ते काही दिवसांत पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. राजेंद्र भारुड हे २०१३ मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाले असून त्यांनी केईएम रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी तसेच विविध प्रशासकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.

अमोल येडगे यांनी २०२३ पासून जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अनेक (posts) प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. त्यांच्या कार्यकाळात ई-गव्हर्नन्समध्ये जिल्ह्याने राज्यात पाचवा क्रमांक मिळवला तसेच विविध निवडणुका सुरळीत पार पडल्या. कार्तिकेयन एस. यांनी जिल्हा परिषदेत स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले होते. के. मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेतील प्रशासकीय सुधारणा आणि निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.दरम्यान, जिल्हा परिषदेत आधीपासूनच महिला पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व असून आता मुख्य कार्यकारी अधिकारीपदीही महिला अधिकारी नियुक्त झाल्याने ‘महिलाराज’ सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *