कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजली दमानिया यांनी भोंदू (Legal)बाबा खरात आणि काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती
यांच्यामध्ये झालेल्या संपर्क संवादाचे सी. डी. आर. काढल्यामुळे मूळ प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे आणि अशा प्रकारचे सी डी आर कसे काय लिंक झाले असा प्रश्न गृहमंत्रालयाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. खाजगी व्यक्तीला दोन त्रयस्थ व्यक्तिमध्ये मोबाईल वरून झालेल्या संवादाची सीडीआर काढता येत नाही.
आता या प्रकरणाची चौकशी होईल. पण या संदर्भात दमानिया त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर तपास अधिकाऱ्यांनीच दिले पाहिजे. अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू होण्याच्या आधीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे भोंदू बाबा खरात याच्याशी संबंध होते आणि त्यांचा मोबाईल वरून संवाद व्हायचा. याबद्दलचे पुरावे श्रीमती अंजली दमानिया यांनी मीडियासमोर सादर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन नेत्यांचे भोंदू बाबाशी कितीतरी हजार सेकंदाचे संवाद झालेले आहेत. भोंदू बाबा खरात आणि हे नेते रोज मोबाईल संदेशाची देवाणघेवाण करत होते. हे परस्परांच्या संपर्कात आणि संवादात का होते?

इतकी महत्त्वाची चर्चा काय झाली होती? त्याचा तपास एस आय (Legal)टी ने केला पाहिजे अशी मागणी श्रीमती दमानिया यांनी समोर बोलताना केली आहे. मुळातच मोबाईल कंपन्यांना दोन व्यक्तींमध्ये मोबाईल वरून झालेल्या संवादाचा सीडीआर देता येत नाही. तशी कायदेशीर तरतूद आहे. फक्त गुन्ह्यांमध्ये तपास आणि पुराव्याचा एक भाग म्हणून तपास अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे सीडीआर संबंधित कंपनीकडून मागवून घेण्याचा अधिकार आहे. मात्र खाजगी व्यक्तीला असे सीडीआर देता येत नाहीत.तर मग श्रीमती अंजली दमानिया यांना हे सीडीआर कसे काय उपलब्ध झाले हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. संभाषणाचे अतिशय महत्त्वाचे असलेले सीडीआर अंजली दमानिया यांना उपलब्ध होतात याचा अर्थ
अशा प्रकारचे सीडीआर बाहेर येणे हे कोणासाठी तरी फायद्याचे असले पाहिजे.

पण मुळात सुनील तटकरे तसेच रूपाली चाकणकर किंवा अन्य (Legal)यांचे हे सीडी आर आहेत आणि त्यांनाच या संदर्भात अंजली दमानिया यांच्याविरुद्ध फिर्याद देता येऊ शकते. अन्य कोणालाही अगदी भोंदू बाबा प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा दमानिया यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करता येऊ शकत नाही असा हा कायदा सांगतो. या संपूर्ण प्रकरणात एक अशी अज्ञात व्यक्ती आहे की जी राजकीय असू शकते. त्या व्यक्तीला भोंदू बाबा खरात प्रकरण हे अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताशी जोडावयाचे आहे. भोंदू बाबा खरात यांने काळी जादू करून हा विमान अपघात घडवून आणला असे वातावरण तयार करावयाचे आहे. म्हणजेच अंधश्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे असा हा प्रकार आहे असे खेदाने म्हणावे लागेल.

अशोक खरात याला त्याच्या विरुद्धचा खटला जलदगती न्यायालयात (Legal) चालून त्याला फाशीची शिक्षा द्यावी तसेच अन्य कोणी दोषी असतील तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे असे सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. वास्तविक भोंदू बाबा खरात याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी किंवा अशा प्रकारची कठोर शिक्षेची तरतूद असलेला खुनाचा गुन्हा
त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीला काही अर्थ उरत नाही. खराब च्या विरुद्ध सध्या जे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये त्याला जास्तीत जास्त आजन्म करावासाची शिक्षा होऊ शकते. अंजली दमानिया यांनी सुनील तटकरे यांचे भोंदू बाबा याच्याशी जवळपास 35 हजार सेकंद मोबाईल वरून बोलणे झाले आहे. खरे तर त्याबद्दल त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि खाजगी संभाषण उघड केल्याबद्दल अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल केला पाहिजे. दोन व्यक्तींमधील संभाषणाचे सीडीआर दमानिया यांना उपलब्ध कोणी करून दिले याबद्दल चौकशी होऊ शकते आणि ज्याने हे सीडीआर त्यांना उपलब्ध करून दिले त्याचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करता येऊ शकते

हेही वाचा :

लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *