तामिळनाडूतील साथानकुलम कस्टोडियल डेथ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (custodial death) सहा वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने आज ऐतिहासिक निर्णय देत या प्रकरणातील दोषी ठरलेल्या नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने या घटनेला “अत्यंत घृणास्पद आणि मानवतेला काळिमा फासणारी” असे संबोधत कठोर भूमिका घेतली.

हे प्रकरण २०२० मध्ये तामिळनाडूतील तूतीकोरिन जिल्हामधील साथानकुलम येथे घडले होते. लॉकडाऊनच्या काळात दुकाने ठराविक वेळेत बंद करण्याचे आदेश असताना, स्थानिक व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांनी आपले मोबाईल दुकान उशिरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, या किरकोळ कारणावरून दोघांवर पोलीस कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप झाला.

तपासात समोर आलेल्या (custodial death) माहितीनुसार, पिता-पुत्रावर रात्रभर निर्दयी अत्याचार करण्यात आले होते. गंभीर जखमांमुळे आणि अतिरक्तस्त्रावामुळे दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली होती आणि पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास केंद्रीय अन्वेषण विभागकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या तपासात हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी पोलिसांनी जाणीवपूर्वक अत्याचार केल्याचे सिद्ध झाले.

या प्रकरणाची सुनावणी प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली, (custodial death) जिथे सर्व नऊ आरोपींना खून आणि इतर गंभीर आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाने या निकालाला मान्यता देत शिक्षा अधिक कठोर करत मृत्युदंड सुनावला. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात असली, तरी देशभरात पुन्हा एकदा पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांबाबत चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला मानवाधिकारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *