नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील (biggest project) सर्वात भव्य प्रोजेक्ट म्हणून चर्चेत आहे. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या मेगा बजेटमध्ये तयार होणारा हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यात अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत असून, त्याच्या मानधनाची सर्वाधिक चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, एका भागासाठी त्याने सुमारे 75 कोटी रुपये फी घेतली आहे. म्हणजेच दोन्ही भागांसाठी त्याची एकूण फी जवळपास 150 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.

रावणाच्या दमदार (biggest project) भूमिकेत यश दिसणार असून, त्याने एका भागासाठी 50 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही भागांसाठी त्याची फी सुमारे 100 कोटी रुपये होते. सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी झळकणार आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या फीचीही चर्चा रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार, तिने एका भागासाठी 6 कोटी रुपये घेतले असून, दोन्ही भागांसाठी तिची एकूण फी 12 कोटी रुपये इतकी आहे.
याशिवाय, हनुमंताच्या शक्तिशाली भूमिकेत सनी देओल दिसणार आहे. या (biggest project) भूमिकेसाठी त्याने एका भागासाठी 20 कोटी रुपये घेतल्याचे सांगितले जाते, म्हणजे दोन्ही भागांसाठी त्याचे मानधन 40 कोटी रुपये होते. भव्य बजेट, दमदार स्टारकास्ट आणि पौराणिक कथानक यामुळे ‘रामायण’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच प्रचंड चर्चेत आला असून, भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागडा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत
शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप