महाराष्ट्रात महिलांच्या (various schemes) सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात असताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना विशेष चर्चेत आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे. अशातच आता मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. उल्हासनगरमधील विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिक्षणात सातत्य राहावे आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबू नये, यासाठी महानगरपालिकेकडून ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’ सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार असून मुलींच्या शिक्षणातील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे.

उल्हासनगर (various schemes) महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सातवी ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही शिष्यवृत्ती स्वर्गीय आमदार ज्योती कालानी यांच्या नावाने दिली जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्यार्थिनींना नियमित आर्थिक मदत देणारी ही (various schemes) पहिलीच योजना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. या निर्णयामुळे विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून शिक्षण क्षेत्रात हा एक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
हेही वाचा :
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत
शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप