दररोजच्या स्वयंपाकात भात हा जवळपास प्रत्येक घरात बनवला जातो.(sticky) मात्र अनेकदा भात शिजवताना तो जास्त चिकट होतो आणि दाणे मोकळे राहत नाहीत, यामुळे चव आणि दिसणं दोन्ही बिघडतं. पण अगदी सोप्या काही टिप्स वापरल्या तर भात परफेक्ट मोकळा आणि सुटसुटीत होऊ शकतो.

भात शिजवण्यापूर्वी तो किमान दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावा. (sticky)यामुळे अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि भात चिकट होत नाही. त्यानंतर भात 15-20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवल्यास दाणे अधिक छान फुलतात. शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. साधारणपणे एक कप तांदळासाठी दीड ते दोन कप पाणी पुरेसे असते.
यासोबतच भात शिजवताना त्यात एक चमचा तूप किंवा काही थेंब (sticky)लिंबाचा रस घातल्यास दाणे एकमेकांना चिकटत नाहीत. भात शिजल्यानंतर लगेच झाकण उघडून त्याला हलक्या हाताने फुलवणेही तितकेच गरजेचे आहे.या छोट्या आणि सोप्या ट्रिक्स वापरल्या तर तुमचा भात नेहमीच मोकळा, सुगंधी आणि परफेक्ट बनेल.
हेही वाचा :
अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार
मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार