बॉक्स ऑफिसवर (new records) सध्या रणवीर सिंहच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हा चित्रपट दररोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन आणि राकेश बेदी यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक होत आहे.

Sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने रिलीजच्या २० व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या (new records) मंगळवारी तब्बल १०.१० कोटी रुपयांची कमाई केली. या एका दिवसाच्या कमाईनंतर भारतातील चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन १,०३३.३७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परदेशातही चित्रपटाची जोरदार कमाई सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण कमाई ४०४ कोटी रुपयांवर गेली आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शन १,२३७.२१ कोटींसह जगभरातील एकूण कमाई आता १,६४१.२१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’शी या चित्रपटाची थेट स्पर्धा सुरू आहे. ‘पुष्पा २’ने भारतात अंदाजे १,२३४.१० कोटींचे नेट कलेक्शन करत जागतिक स्तरावर १,७४२.१० कोटींची कमाई केली आहे. त्या तुलनेत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ अजून थोड्या अंतरावर असून भारतात सुमारे २०० कोटी आणि जागतिक स्तरावर जवळपास १०० कोटींची कमाई केल्यास हा चित्रपट ‘पुष्पा २’ला मागे टाकू शकतो.
याआधी डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित (new records) झालेल्या ‘धुरंधर’ या पहिल्या भागालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटात अक्षय खन्ना यांच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली होती. ‘धुरंधर २’मध्येही कथा अधिक थरारक पद्धतीने पुढे नेण्यात आली असून भारतीय गुप्तहेर हमझा अली माझारी उर्फ जसकीरत सिंह रंगी यांच्या प्रवासावर आधारित कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी किती मोठे विक्रम मोडतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू