डासांपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अगरबत्त्यांबाबत एक धक्कादायक (incense sticks) माहिती समोर आली असून, या उत्पादनांचा वापर आता आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील कृषी विभागाला मिळालेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि त्यातून अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.

तक्रारीनुसार काही डास (incense sticks) प्रतिबंधक अगरबत्त्यांमध्ये मेपरफ्लुथ्रिनसारख्या किटकनाशकाचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ठाणे विभागातील गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीवर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर अगरबत्तीचे बॉक्स जप्त करण्यात आले. त्यापैकी काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्रयोगशाळेतील अहवालानुसार त्या अगरबत्त्यांमध्ये डायमेफ्लुथ्रिन हे रसायन आढळून आले. विशेष म्हणजे, या प्रकारच्या किटकनाशकांचा अगरबत्त्यांमध्ये वापर करण्यासाठी कोणतीही अधिकृत मान्यता नाही.
या निष्कर्षानंतर संबंधित उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश (incense sticks) देण्यात आले असून, संबंधित कंपनीविरोधात कीटकनाशक कायदा 1968 आणि नियम 1971 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर कृषी विभागाने राज्यभर मोहीम हाती घेतली असून, बेकायदेशीर साठा जप्त करण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभागीय अधिकारी आपल्या कारवाईचे अहवाल थेट पुणे येथील कृषी आयुक्तालयाकडे सादर करणार आहेत.
तज्ज्ञांच्या मते, (incense sticks) अशा प्रकारच्या रसायनांचा धूर श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे त्रास आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी डास प्रतिबंधक अगरबत्त्या खरेदी करताना त्या उत्पादनावर CIBRC नोंदणी क्रमांक आहे की नाही याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. डासांपासून संरक्षण करताना आरोग्याशी तडजोड होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा छोट्या उपायामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा :
”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू