बीड जिल्ह्यात उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने (the fraudster) राज्यभरात खळबळ उडवली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पहिल्या गुन्ह्यातील त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पोलिसांकडून आणखी गुन्ह्यांमध्ये त्याचा ताबा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणात (the fraudster) दररोज नवे खुलासे समोर येत असून महिलांकडून तक्रारींचा अक्षरशः पूर आला आहे. आणखी ११ महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण १९ तक्रारी विशेष तपास पथकाकडे जमा झाल्या आहेत. अनेक महिलांनी कुटुंबीयांच्या पाठिंब्याने पुढे येत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी मांडली आहे. ‘ऊर्जा, पूजा आणि शरीरशांती’च्या नावाखाली फसवणूक करून भीती दाखवत महिलांना जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप आहे. प्रसाद, अंगारा किंवा तीर्थामध्ये गुंगी आणणारे पदार्थ देऊन त्यानंतर शोषण केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.

या सर्व प्रकरणात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले असून तपास अधिकच (the fraudster) वेगाने सुरू आहे. एसआयटीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे तपशील समोर आले असून सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयीन प्रक्रिया ऑनलाईन पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांच्याविरोधात एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

या पत्रात त्यांच्या (the fraudster) संदर्भात गंभीर आरोप करण्यात आले असून सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्रज्ञा खोसरे यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावत कोणताही ठोस पुरावा नसताना आपली बदनामी केली जात असल्याचे म्हटले आहे. तसेच, संबंधितांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. एकीकडे महिलांकडून वाढत्या तक्रारी आणि दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. सामान्य नागरिकांकडूनही या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *