घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून सध्या कथानक अत्यंत रंगतदार वळणावर पोहोचले आहे. दररोज रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रणदिवे कुटुंबाला त्रास देणाऱ्या मायाचं खरं रूप समोर आल्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिघीही सुना आता एकत्र येत मायाविरोधात ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. या संघर्षाला आता केवळ कौटुंबिक न राहता कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार आहे. (series) त्यामुळे मालिकेत लवकरच कोर्टरूम ड्रामा रंगताना दिसणार आहे.
या नव्या ट्रॅकला अधिक धार देण्यासाठी मालिकेत एका दमदार पात्राची एन्ट्री होत आहे. (series)मायाची बाजू लढवण्यासाठी प्रसिद्ध वकील गीतांजली सरंजामे हिची एंट्री होणार असून ही भूमिका स्मिता शेवाळे साकारणार आहेत. गीतांजली ही अत्यंत हुशार, आत्मविश्वासू आणि अनुभवी वकील असून तिने आतापर्यंत एकही केस गमावलेली नाही, अशी तिची ओळख आहे.
मायाच्या बाजूने उभी राहणारी गीतांजली आणि जानकीसाठी लढणारी अवंतिका यांच्यात कोर्टात जोरदार सामना रंगणार आहे. या न्यायालयीन लढतीत सत्याचा विजय होणार की मायाचा डाव पुन्हा यशस्वी ठरणार, याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. (series) त्यामुळे येणारे भाग मालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून प्रेक्षकांना नवे धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू