मराठी मनोरंजन विश्वातून (sad news) एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ फेम अभिनेते शेखर फडके यांच्या वडिलांचे, विजयकुमार फडके यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली, त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची (sad news) माहिती स्वतः शेखर फडके यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली. वडिलांच्या अचानक जाण्याने ते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले असून, त्यांच्या चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील सहकाऱ्यांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

शेखर फडके हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय आणि (sad news) अनुभवी कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, नाटके आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘आपला बुआ असा आहे’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘विठू माऊली’, ‘405 आनंदवन’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. तसेच ‘आटली बाटली फुटली’, ‘गडबड गोंधळ’, ‘थैमान’ आणि ‘निवडुंग’ या चित्रपटांमधील त्यांच्या कामाचेही कौतुक झाले आहे.

विजयकुमार फडके यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशीच प्रार्थना सर्वत्र केली जात आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *