सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्ती कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अधिक (marriage)चर्चेत असतात. आता देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मोठ्या राजकीय नेत्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेत्रीसोबत राजकीय नेत्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण तेव्हा आलं जेव्हा त्याच्या पत्नीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत पतीवर गंभीर आरोप केले. पतीचं गेल्या अनेक वर्षांपासून एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध आहेत असं तिने सांगितलं. त्यानंतर लग्नाच्या तब्बल 27 वर्षांनंतर राजकीय नेत्याचा संसार मोडणार का आणि राजकीय नेता वयाच्या 51 व्या वर्षी दुसरं लग्न करणार का? असे प्रश्न उपस्थित होत असतात अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टमधून मोठा खुलासा झाला आहे.

सांगायचं झालं तर, सध्या ज्या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा (marriage) रंगली आहे ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, अभिनेत्री तृषा आणि अभिनेता विजय थलपती आहे.. अभिनेता थलपथी विजय आता राजकारणात सक्रियपणे सहभागी झाला आहे. तो तामिळनाडूची निवडणूक लढवण्याची योजना आखत आहे. या सर्व राजकीय चर्चांच्या दरम्यान, विजय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

विजय याचं नाव तृषा हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. दरम्यान, तिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक क्रिप्टिक पोस्ट देखील शेअर केली आहे. म्हणून चर्चांनी आणखी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृषा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘प्रेमच सर्वकाही नाही… तरी देखील प्रेमाशिवाय काहीत नाही… हेच सत्य आहे…’एवढंच नाही तर, तृषा हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, ‘मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे मला कोणासोबत वाद घालायचे नाहीत. जर तुम्ही म्हणता की, हत्ती उडू शकतो, तर तुम्ही बरोबर आहात… मी तुमच्या वक्तव्यावर सहमत आहे असं काहीही नाही… तर मला आता कोणाला समजवायचं नाही…’

‘मी एक गोष्ट शिकली आहे आणि ती म्हणजे, शांत राहणे… जे अधिक (marriage)किमती आहे… कोणाला समजावण्यापेक्षा शांत राहणं अधिक योग्य आहे.. प्रत्येकावर आपली ऊर्जा खर्च करण्याची काहीही गरज नाही.’ अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.अभिनेत्याची पत्नी संगीताने विजयवर नात्यात फसवणुकीचा आरोप करत चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. अभिनेता विजय अनेक कार्यक्रमांमध्ये तृषासोबत दिसला होता. ज्यामुळे चर्चा अधिक रंगल्या… पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा :

लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *