पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी (Temple)जाण्याचा विचार करत असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर पुढील काही दिवसांसाठी भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ९ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत मंदिरात दर्शन बंद राहणार आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुमारे ५३ दिवस भाविकांना प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाही.

भीमाशंकर मंदिर परिसरात सध्या नवीन सभामंडप उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे (Temple). यासोबतच मंदिर परिसरातील पायऱ्यांचा मार्ग, सुविधा आणि इतर विकासकामेही केली जात आहेत. या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री ठेवण्यात आली आहे.भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता या परिस्थितीत अपघात होऊ नयेत आणि सुरक्षेचा कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरही नियोजन सुरू (Temple)करण्यात आले आहे. २०२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार असून त्या काळात भीमाशंकर येथेही मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे भविष्यातील गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी प्रशासन सध्या आवश्यक उपाययोजना करत आहे.या सर्व कामांचा आढावा घेत पावसाळ्यापूर्वी मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *