उन्हाळा सुरू होताच बाजारात हंगामी फळांची रेलचेल वाढते (watermelon)आणि शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात कलिंगडाचा मोठ्या प्रमाणात समावेश करतात. जवळपास ९१ टक्के पाण्याचे प्रमाण असलेले कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. त्यात असलेली नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देते, त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ विशेष लोकप्रिय ठरते. मात्र याच कलिंगडाचे सेवन चुकीच्या पद्धतीने केल्यास ते आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

योगाचार्य उमंग त्यागी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या (watermelon)माहितीत कलिंगड खाताना होणाऱ्या काही सामान्य चुका आणि योग्य पद्धती स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या मते, अनेकजण रिकाम्या पोटी कलिंगड खातात, ही सवय पचनासाठी घातक ठरू शकते. आयुर्वेदानुसार कलिंगड थंड आणि जड प्रकृतीचे असल्याने ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास जठराग्नी मंदावतो. परिणामी पचनक्रिया बिघडून शरीरात अपायकारक द्रव्ये तयार होण्याची शक्यता वाढते. यामुळे जडपणा, थकवा आणि सुस्ती यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

तसेच आधुनिक वैद्यकशास्त्रानुसारही कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स (watermelon)तुलनेने जास्त असल्यामुळे रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.याशिवाय आणखी एक मोठी चूक म्हणजे हंगाम सुरू होण्यापूर्वीच कलिंगड खाणे. एप्रिल महिन्यात बाजारात येणारी अनेक कलिंगडे ऑफ-सीझन असू शकतात. अशा वेळी शरीर त्या फळांना योग्य प्रकारे पचवू शकत नाही, ज्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, मे महिन्याच्या मध्यापासून कलिंगड खाणे अधिक योग्य ठरते.कलिंगड खाण्याची योग्य वेळ आणि पद्धतही महत्त्वाची आहे. सकाळी उशिरा ते संध्याकाळी दरम्यान कलिंगड खाणे फायदेशीर मानले जाते. तसेच ते दूध, दही किंवा इतर जड पदार्थांसोबत खाणे टाळावे, कारण अशा संयोजनामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो.

अनेकजण कलिंगड फ्रिजमध्ये ठेवून खाण्याची सवय लावतात, पण अतिथंड कलिंगड खाल्ल्यानेही शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, यामुळे पचनक्रिया मंदावणे, घसा खवखवणे किंवा सर्दी-खोकल्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कलिंगड खाण्यापूर्वी ते काही वेळ सामान्य तापमानात ठेवणे अधिक सुरक्षित मानले जाते.एकूणच, शरीराला थंडावा देणारे आणि पाण्याची कमतरता भरून काढणारे कलिंगड योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यासच त्याचा पूर्ण फायदा मिळतो. चुकीच्या सवयी टाळल्यास हे फळ उन्हाळ्यातील आरोग्यदायी साथीदार ठरू शकते.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *