अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्ध विराम जाहीर केला.(declared) युद्ध बंदी जाहीर होताच जगभरातील शेअर बाजाराला आनंदाचे भरते आले आहे. भारतीय शेअर बाजारालाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना झटका बसला. पण आता सुगीचे दिवस आले आहेत. एका घोषणेने बाजाराचा मूड बदलला. बुधवारी आशियातील बाजारात 5 टक्क्यांची तेजी दिसली. तर आज सकाळी भारतीय शेअर बाजार चमकून उठला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या रेघा हिरव्या रंगात न्हाऊन निघाल्या. दोन्ही निर्देशांक जवळपास 3.5 टक्क्यांनी धावला.

अवघ्या काही युद्ध थांबलं अन् भारताचं नशीबच पालटलं, (declared)गॅस ते पेट्रोल सगळं स्वस्त… मोठी अपडेट समोर!सकाळच्या सत्रात बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये जवळपास 2822 अंकांची तेजी दिसली. सेन्सेक्स 77,439 अंकावर ट्रेड करत होता. तर एनएसई निफ्टी 800 अंकांनी वधारला. निफ्टी 23,949 अंकावर ट्रेड करत होता. या काळात सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 कंपन्यांमध्ये तेजीचे सत्र दिसले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये 8.2 टक्के, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये 9 टक्के तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये 8.8 टक्क्यांची वाढ दिसली.

शेअर बाजारातील तेजीच्या सत्रात एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि सनफार्मा या कंपन्यांना मात्र सूर गवसला नाही. तर इंडिगोच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची तेजी दिसली. मारुती, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स या शेअरमध्ये 6 टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी दिसली. गुंतवणूकदारांची आज चांदी झाली.ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर केली. त्यामुळे आता दोन आठवडे मध्य-पूर्वेत मोठी शांतता राहील. याभागातून येणारा इंधन पुरवठा आता सहज होईल. तर दुसरीकडे इंधनाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जगात सुरु असलेले तेल संकट टळले आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी धूम दिसली.

इराणवर दोन आठवडे कोणतेही हल्ले न करण्याचा निर्णय डोनाल्ड (declared)ट्रम्प यांनी जाहीर केला. त्यानंतर आशियाच्या बाजारात तेजीचे सत्र दिसले. आशिया बाजारात बंपर तेजी दिसली. जपानच्या निक्केई 225 टक्क्यांनी उसळला. निक्केई 56,230 अंकावर पोहला. टॉपिक्समध्ये 3 टक्क्यांची तेजी दिसली. हा निर्देशांक 3,775 अंकावर पोहचला. कोस्पीमध्ये 6 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली. हँग सँग फ्यूचर इंडेक्समध्ये मोठी तेजी दिसली. तर जागतिक शेअर बाजारही या आनंदवार्तेच्या हिंदोळ्यावर असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *