अमेरिका इराणने युद्ध थांबवण्याची घोषणा केली. युद्ध थांबवण्याची(government)घोषणा करताच केंद्र सरकारने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. भारतीयांसाठी प्रवासासंबंधित अॅडवायजरी जारी केली आहे. त्यामध्ये भारतीयांना शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे आवाहन केले आहे. भारताने हाय अलर्ट जारी केला आहे.
केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे निर्देश दिले आहे. भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यासही सांगितले आहे. तसेच परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू नका, फक्त शिफारस केलेल्या मार्गांचाही सल्ला देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने जारी केले हेल्पलाइन नंबर
केंद्र सरकारने इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर (government)जारी केले आहेत. नागरिक +989128109115, +989128109109, +989128109102, आणि +989932179359 या नंबरवर कॉल करु शकतात. याचसोबत cons.tehran@mea.gov.in या ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. इराणमधील भारतीयांना ४८ तास सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अमेरिका आणि इराणमधील युद्धाला दोन आठवड्यांसाठी पूर्णविराम मिळाला आहे. (government)डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ७ एप्रिल रोजी याबाबत घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला तडजोड करण्यासाठी ६ संधी दिल्या आहेत, असंही अमेरिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे आता दोन आठवडे शस्त्राचा वापर करणार नाही. या कालावधीत इराणमधील भारतीयांना परत येण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *