उन्हाळ्याच्या कडक तापमानात थंडावा मिळवण्यासाठी आणि कुटुंबासोबत (water parks) आनंदाचे क्षण घालवण्यासाठी अनेकजण वॉटरपार्ककडे धाव घेतात. मात्र हीच मजा काही वेळा जीवघेणी ठरत असल्याच्या घटना पुन्हा समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडलेली ताजी दुर्घटना याच गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधते.

मोराची चिंचोली (water parks) परिसरातील एका कृषी पर्यटन केंद्रात कुटुंबासह सहलीला गेलेल्या ३७ वर्षीय महिलेवर दुर्दैवी प्रसंग ओढवला. वॉटर स्लाईडचा आनंद घेत असताना पूलमधील पाण्याची पातळी कमी असल्याने ती जोरात खाली आपटली. या अपघातात तिच्या पाठीचे चार मणके तुटले आणि ती अर्धांगवायूग्रस्त झाली. विशेष म्हणजे, अपघातानंतर तात्काळ मदत मिळावी यासाठी आवश्यक असलेली रुग्णवाहिका किंवा प्राथमिक उपचारांची सुविधाच त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिची परिस्थिती आणखी गंभीर बनली.
या घटनेनंतर पीडित कुटुंबाने पर्यटन केंद्राच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, (water parks) वॉटरपार्कमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही एप्रिल २०२५ मध्ये भोर तालुक्यातील एका वॉटरपार्कमध्ये झिपलाईनवरून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. अशा सलग घटनांमुळे वॉटरपार्कमधील सुरक्षाव्यवस्था किती ढासळलेली आहे, हे स्पष्ट होत आहे. नफ्याच्या हव्यासापोटी काही ठिकाणी सुरक्षेचे नियम डावलले जात असल्याचे आरोप वारंवार होत आहेत. प्रशिक्षित कर्मचारी, योग्य देखभाल, आपत्कालीन सुविधा आणि नियमांचे काटेकोर पालन या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम थेट पर्यटकांच्या जीवावर होतात. त्यामुळे प्रशासनाने अशा ठिकाणांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे.
दुसरीकडे, पर्यटकांनीही (water parks) स्वतःची जबाबदारी ओळखणे तितकेच महत्त्वाचे आहे. आकर्षक जाहिरातींना भुलून कोणत्याही ठिकाणी जाण्याऐवजी त्या वॉटरपार्कची सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षित स्टाफ, आणि आपत्कालीन सुविधा यांची माहिती घेणे गरजेचे आहे. थोडीशी खबरदारी आणि जागरूकता मोठा अपघात टाळू शकते. उन्हाळ्यातील मजा कायम ठेवायची असेल, तर सुरक्षिततेला प्राधान्य देणं हीच काळाची गरज आहे.
हेही वाचा :
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले
युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर