बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. (The politics) राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे हा प्रयत्न अडचणीत आला आहे आणि बारामतीत सरळ लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे.

राज्यात एखाद्या मोठ्या नेत्याच्या (The politics) निधनानंतर संबंधित मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा मानली जाते. याच पार्श्वभूमीवर महायुतीने सर्व पक्षांना सहकार्याची विनंती केली होती. तरीदेखील काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या निर्णयामुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढाकार घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (The politics) हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा आणि परंपरेचा सन्मान राखावा, अशी विनंती केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना हा संवाद अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.
बारामती पोटनिवडणुकीत एकूण ५५ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस, राष्ट्रवादी (The politics) आणि इतर अपक्ष उमेदवारांमुळे लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. करुणा धनंजय मुंडे यांचीदेखील या निवडणुकीत एन्ट्री झाल्याने समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. आता काँग्रेस आपली भूमिका बदलते का, की थेट लढत स्वीकारते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले
युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर