मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि इराण-अमेरिका संघर्षामुळे जगभरात (economic instability) आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असताना भारतासाठी एक दिलासादायक आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. तेलाच्या वाढत्या किमती, अस्थिर शेअर बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव या पार्श्वभूमीवरही भारतीय अर्थव्यवस्था ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या एप्रिल 2026 च्या दक्षिण आशिया आर्थिक अहवालात भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून 6.6 टक्के करण्यात आला आहे.

यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये हा (economic instability) अंदाज 6.3 टक्के होता. जागतिक संकटाच्या काळातही भारताने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे या अहवालातून अधोरेखित झाले आहे. कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली गती कायम ठेवण्यात यश आले आहे. इराण-अमेरिका तणावामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर नकारात्मक परिणाम दिसून आला, मात्र भारतावर त्याचा थेट परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जीएसटी दरांमध्ये झालेली कपात, अंतर्गत मागणी आणि विविध क्षेत्रातील स्थिरता यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळाल्याचे जागतिक बँकेने नमूद केले आहे.
दरम्यान, मध्य पूर्वेतील संघर्षामुळे होर्मुज खाडी या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर परिणाम (economic instability) झाला असून, त्याचा परिणाम एलपीजी गॅस पुरवठ्यावरही जाणवत आहे. काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असला तरी भारताशी असलेल्या संबंधांमुळे इराणकडून भारतीय जहाजांना मर्यादित परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे. जग आर्थिक संकटाचा सामना करत असताना भारताने स्थिरता आणि वाढीचा मार्ग कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची ही कामगिरी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा :
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले
युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर