लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी (beneficiaries) बातमी समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. अनेक लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे त्यांचा लाभ कायमचा बंद झाला की काय अशी शंका व्यक्त केली जात होती.

दरम्यान, शासनाकडून (beneficiaries) योजनेतील लाभार्थ्यांची सखोल पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेत काही महिला निकषात अपात्र ठरल्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. तसेच ज्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचेही पैसे रोखण्यात आले आहेत. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये केवायसी करताना झालेल्या त्रुटींमुळे लाभ तात्पुरता बंद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा महिलांनी केवायसीमध्ये आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, पुढील महिन्यात लाभ मिळणार की नाही याची माहिती आता (beneficiaries) लाभार्थ्यांना स्वतः तपासता येणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन अर्जदार लॉग इन करून, अर्जाची स्थिती किंवा लाभार्थी यादी तपासता येईल. आधार क्रमांक आणि अर्ज क्रमांक टाकल्यानंतर संबंधित माहिती स्क्रीनवर दिसणार आहे. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार असून, पात्र महिलांना लवकरच पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले
युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर